एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मग आरोपीने स्वतःलाही संपवलं; बंगळुरूत नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

बंगळुरूच्या कोट्टीगेपाल्या भागात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करत आरोपीने गळफास घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच कामाक्षीपाल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ‘सीन ऑफ क्राईम’ पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत असे आरोपीचे नाव असूनतो चालक होता. प्राथमिक माहितीनुसार तो मानसित तणावात होता आणि नैराश्येतून त्याने हे कृत्य केले. प्रशांत आई, आजी आणि मेहुण्याची धारदार चाकूने हत्या करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांनी त्याला पकडून घरातच कोंडून ठेवले. यानंतर आरोपीने एका खोलीत गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मंगलाम्मा (55), नंजम्मा (65) आणि सतीश (50) अशी हत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्ह्यामागील कारण शोधण्यासाठी पोलीस शेजारी, स्थानिक रहिवासी आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत. जबाब नोंदवले जात असून तपास अधिकारी सर्व संभाव्य पैलूंची पडताळणी करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.