
यंदा जून ऐवजी जुलैमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला होता. 6 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे लोणावळा – कर्जत मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र यासाठी काही कालावधी लागू शकतो. सध्या दुरुस्त करण्यात आलेल्या एकाच मार्गावरून सध्या गाड्या चालवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने तात्पुरत्या कालावधीसाठी खालील गाड्यांचे मार्ग बदलण्याचा किंवा शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशनचा निर्णय घेतला आहे. 11 जुलै 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन करण्यात आल्या आहेत.
‘या’ गाड्यांचे मार्ग वळवले
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22102 मदुरई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 11018 कराईकल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 20919 एमजीआर चेन्नई – एकतानगर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर – राजकोट एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22718 सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस, गाडी क्रमांक 09420 तिरुचिरापल्ली – अहमदाबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 20953 एमजीआर चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22193 दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22919 एमजीआर चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 20967 सिकंदराबाद – पोरबंदर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 09628 सोलापूर – अजमेर एक्सप्रेस या गाड्या दौंड – मनमाड – जळगाव – पाळधी – सुरत मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 20822 संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस ही गाडी मनमाड – दौंड कॉर्ड लाईन मार्गे वळवण्यात आली आहेत. तर गाडी क्रमांक 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस – कराईकल एक्सप्रेस, गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22101 लोकमान्य टिळक टर्मिनस – मदुराई एक्सप्रेस या गाड्या कल्याण – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 20954 अहमदाबाद – एमजीआर चेन्नई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 16613 राजकोट – कोइम्बतूर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22920 अहमदाबाद – एमजीआर चेन्नई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22717 राजकोट – सिकंदराबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 20968 पोरबंदर – सिकंदराबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 20920 एकता नगर – एमजीआर चेन्नई एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 09419 अहमदाबाद – तिरुचिरापल्ली एक्सप्रेस या गाड्या सुरत – पाळधी – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस, गाडी क्रमांक 09627 अजमेर – सोलापूर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 20991 अजमेर – दौंड एक्सप्रेस या गाड्या सुरत – पाळधी – मनमाड – दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक 20821 पुणे – संतरागाछी एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाइन – मनमाड – भुसावळ मार्गे वळवण्यात आली आहे.
पुणे येथे शॉर्ट टर्मिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11140 होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12116 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.
खडकी येथे शॉर्ट टर्मिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11302 केएसआर बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या खडकी येथे शॉर्टटर्मिनेट करण्यात येतील.
पुणे येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – केएसआर बेंगळुरू एक्सप्रेस पुणे येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होतील.
खडकी येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 12115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट एक्सप्रेस या गाड्या खडकी येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होतील.




























































