
गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत किनारा पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले रहाणार आहे.
पावसाळ्यात समुद्रकिनारा खवळलेला असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटनासाठी तसेच समुद्रस्नानासाठी बंद रहाणार आहे.



























































