
सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये एका तरूणीने मुंडन केले आहे. या तरुणीचे नाव कीर्तना मेनन असे आहे. लग्नासाठी कुटुंबाकडून आणि समाजाकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा नेटिझन्सकडून केला जात होता. मात्र, आता स्वतः कीर्तनाने समोर येऊन यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडिओमध्ये मागच सत्य ?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कीर्तना तिचे लांब केस कापून टक्कल करताना दिसते आहे. या व्हिडिओला “POV: My mom planned my marriage” (माझ्या आईने माझे लग्न ठरवले तेव्हा…) असे कॅप्शन देण्यात आले होते. हे कॅप्शन पाहून लोकांनी अरेंज मॅरेज टाळण्यासाठी किंवा त्याचा निषेध म्हणून तिने आपले केस काढले आहेत, असा अंदाज लावला. अनेकांनी तिला ट्रोलही केलं. यावर कीर्तनाने स्पष्टीकरण दिले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, माझ्यावर लग्नाचा कोणताही दबाव नव्हता. “माझ्या लग्नाचा असा कोणताही प्लॅन नव्हता आणि घरच्यांचा कसलाही दबाव नव्हता. लोकांनी कॅप्शनचा भलताच अर्थ काढला. मला आयुष्यात बदल करायला आवडतात. एका दिवशी सकाळी मला अचानक वाटले की आपण टक्कल करावे. मी आईला सांगितले आणि आम्ही दोघींनी जवळच्या मंदिरात जाऊन केस दान केले. जर एखाद्या स्त्रीने टक्कल केले की लोक लगेच नवल करतात. मात्र ही फार मोठी गोष्ट नाही आणि लोकांनी याकडे नेहमीप्रमाणेच सामान्य गोष्ट म्हणून पाहिले पाहिजे, असे ती म्हणाली.
कीर्तनाने या संपूर्णप प्रकरणावर सविस्तर व्हिडिओ तयार करून तिच्या यूट्यूब चॅनलवरही शेअर केला आहे. केवळ एका कॅप्शनमुळे या गोष्टीचा गैरसमज झाला आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार चर्चेचा विषय बनला होता.



























































