Ratnagiri News – आंहुवाडी किनारऱ्यावर कासवाला जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे आंबेवाडी समुद्रकिनाऱ्या आज दुपारी एक कासव जखमी अवस्थेत सापडले. कासवमित्र सागर सुर्वे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा समुद्रात सोडून त्याला जीवदान दिले. आंबुवाडी समुद्रकिनारी सातत्याने कासव येत असून त्या परिसरात कासव अंडी घालत आहेत त्यामुळे शासनाने आंबुवाडी किनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांनी केली आहे.