Cockroach Janta Party Protest- CJP चा मोर्चा संसद भवनाजवळ पोहोचला, आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोज जनता पार्टीचा धडक मोर्चा संसद भवनाजवळ पोहोचला आहे. सध्या हा मोर्चा संसद भवनाजवळी रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयाजवळ पोहोचला आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक संसद भवनाच्या चारही बाजूने संसदेजवळ पोहोचले आहेत. पोलिसांनी संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं असून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचे समजते.

पोलिसांनी संसद भवनाजवळ मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मोर्चकर हे संसद भवनापर्यंत जाण्यावर ठाम आहेत. अनेक आंदोलकस रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत आहेत.

अभिजीत दिपकेंना केरळ भवनजवळ थांबवले

हजारो तरुणांच्या संख्येतील तरुणांसोबत निघालेले अभिजीत दिपके यांना केरळ भवन जवळ पोलिसांनी थांबवून ठेवले आहे. मात्र आंदोलक हे संसद भवनापर्यंत पोहोचले आहेत.