
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मनमाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मनमाड या दोन बँकांचा समावेश आहे. याशिवाय द युनाएटेड पुरी निमपारा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशालादेखील आर्थिक दंड करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 13.30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तर मनमाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. द युनाएटेड पुरी निमपारा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशा या बँकेला केवायसी संदर्भातील नियमांची पूर्तता न केल्यानं 3 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.





























































