
सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील NHPC तिस्ता स्टेज हायड्रोलेक्ट्रीक प्रोजेक्टच्या निर्माणाधीन बोगद्यात भुस्खलन झाले असून या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप वीसहून अधिक कामकार हे बोगद्यात अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सर्व मृतदेह सिंगतम जिल्हा रुग्णालय, गंगटोक येथील एसटीएनएम (STNM) रुग्णालय आणि नामची जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, नामची जिल्हा प्रशासन, एनएचपीसी (NHPC) अधिकारी, एसडीआरएफ (SDRF), एनडीआरएफ (NDRF), सिक्कीम पोलीस, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांच्या संयुक्त समन्वयाने मदत व बचाव कार्य चालवले जात आहे. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (SSDMA) या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.





























































