
NEET परिक्षेच्या पेपरफुटी विरोधात गेल्या अनेत दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी संसदेवर धडक मोर्चा काढला. या मोर्च्यात देशभरातून हजारो तरुण सहभागी झाले होते. संसदेकडे शांततापूर्ण पद्धतीने निघालेल्या तरुणांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक तरुण रक्तबंबाळ होईपर्यंत जखमी झाले आहेत. यामुळे सोमवारी संसद भवनात दिवसभर तणावाचे वातावरण होते. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचे समजते. या प्रकारानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॉक्रोज जनता पार्टीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही मागणी केली आहे.
Narendra Modi ji must resign 🥺 pic.twitter.com/TxLMNoiRad
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 20, 2026





























































