44 सोमाली चाच्यांना हायकोर्टाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च 2024 साली अरबी समुद्रात जहाजांचे अपहरण केल्या प्रकरणी पकडलेल्या 44 सोमाली चाच्यांना विशेष न्यायालयाने आज दणका दिला. अतिरिक्त न्यायाधीश संजय दिघे यांनी या चाच्यांना समुद्री चाचेगिरीविरोधी कायदा, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा, तसेच खुनाचा प्रयत्न आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतलेल्या इराणी मासेमारी नौकेची सुटका करताना नौदलाने 9 चाच्यांना अटक केली होती. या नौकेवर काही पाकिस्तानी नागरिकही होते. त्याच महिन्यात व्यापारी जहाजाचे अपहरण केल्या प्रकरणी आणखी 35 चाच्यांना नौदलाने पकडले. यानंतर सर्व आरोपींना मुंबईत आणून यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान सर्व 44 आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला होता.