
‘कॉक्रोच जनता पार्टी’ च्या संसदेवरील धडक मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ”आम्हाला या प्रकरणात ओढू नका” असे म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती तेआस कारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
सोमवारी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अति-बळाच्या वापराबाबत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करणारी याचिका एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. यावर उत्तर देताना मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी, “या सर्व प्रकारांमध्ये न्यायालयाला मधे ओढू नका,” अशा शब्दांत आपले मत व्यक्त केले.
NEET परीक्षेच्या पेपरफुटीची जबाबदारी घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करत आहे. CJP ने 20 जुलै रोजी संसदेवर धडक मोर्चाची हाक दिली होती. त्यानंतर देशभरातून विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. या शांततापूर्ण मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.





























































