उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची घेणार भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला आहे. उद्या ते विद्यार्थ्यांना भेटायलाही जाणार आहेत.