
सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने फरफटत नेले. त्यानंतर आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्याचे दिसत आहे, असा हल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.
धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता ‘विद्यार्थ्यांशी चर्चा’ करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.





























































