
दिल्लीत विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचे अनेक देशांमध्ये पडसाद उमटले. लंडनमध्ये हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयासमोर शेकडो तरुण गोळा झाले आणि त्यांनी लाठीमाराचा निषेध केला. आयर्लंडमधील डब्लीन येथेदेखील हिंदुस्थानी दूतावासासमोर मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी समुदायाने निदर्शने केली. तरुणांच्या हाती फुले आणि बॅनर्स होते. नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम येथे विद्यार्थ्यांनी रॅली काढली. याशिवाय जर्मनी, कॅनडातही निर्दशने झाली.





























































