तुमच्या उपस्थितीने आम्हाला लढण्याची ताकद दिली; अभिजीत दिपके यांनी मानले उद्धव ठाकरे यांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन त्यांनी अभिजित दीपके यांच्यासह अन्य आंदोलकांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांच्या हिमतीला दाद देत ‘ही ठिणगी आम्ही ती विझू देणार नाही. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे,’ असा शब्द जेन-झी आंदोलकांना दिला. तसेच त्यांनी जखमी आंदोलकांची देखील भेट घेत विचारपूस केली.

उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरून त्यांचे आभार मानले आहेत. ”काल झालेल्या पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आणि जंतर-मंतरवर येण्यासाठी मुंबईहून खास येणाऱ्या उद्धव ठाकरे साहेबांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. सर, तुमच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि आम्हाला नव्याने लढण्याची ताकद दिली. तुमच्या या पाठिंब्यासाठी आम्ही सदैव ऋणी राहू”, असे अभिजीत दिपके यांनी पोस्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)