IND vs ZIM – मालिकेपूर्वीच झिम्बाब्वेच्या कर्णधाराचा टीम इंडियाला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका गुरुवारी सुरू होत आहे. पण झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मालिकेपूर्वीच टीम इंडियाला खणखणीत इशारा दिला आहे. सिकंदर रझाचे म्हणणे आहे की, आमच्या संघाला हलक्यात घेता येणार नाही आणि या मालिकेत दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत.

हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी-२० सामना २३ जुलैला खेळवला जाईल. या मालिकेत भारताला फेव्हरिट मानले जात आहे, परंतु सिकंदरचे म्हणणे आहे की, त्याच्या संघाला हलक्यात घेता येणार नाही. कारण त्याच्या खेळाडूंमध्ये टीम इंडियाला कडवी झुंज देण्याची क्षमता आहे.

सामना अटीतटीचा होणार

रझाचा विश्वास आहे की, टीम इंडियाला मजबूत मानले जात असले तरी, ही मालिका अटीतटीची होईल. रझा म्हणाला की, दोन्ही संघांना मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे, पण मला खात्री आहे की झिम्बाब्वे सातत्यपूर्ण आणि रोमांचक क्रिकेट खेळत आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, ही मालिका खूपच रंजक होणार आहे.

तो पुढे म्हणाला की, ‘होय, हिंदुस्थानी संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे आणि तुम्ही पाहिले तर झिम्बाब्वे संघही मोठ्या प्रमाणात बदलाच्या काळातून जात आहे. मला ही मालिका एकतर्फी वाटत नाही.’

उलटफेर करण्याची क्षमता

हिंदुस्थानी क्रिकेट संघ दिग्गज मानला जातो, पण झिम्बाब्वेला कमी लेखणे त्यांच्यासाठी घोडचूक ठरू शकते. या संघाने टीम इंडियाच्या मागील दौऱ्यातील पहिलाच सामना जिंकला होता. या वर्षी भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून झिम्बाब्वेने मोठा उलटफेर घडवला होता. हा संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत काहीही करू शकतो.