आंदोलकांना पांगवण्यासाठी वापरल्या Expired अश्रुधुराच्या नळकांड्या? तरूणांचा आरोप; व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखाली सोमवारी (20 जुलै) काढण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चाला हिंसक वळण आले. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ज्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली.

या हिंसक चकमकीत 100 हून अधिक आंदोलक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्वत: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये आंदोलक हातात झेंडे घेऊन आणि काही जण कॉकरोचचे कपडे परिधान करून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या या पोलीस कारवाईवरून सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली असून राजकीय नेत्यांनीही यावर टीका केली आहे. दरम्यान, ‘imrealshivam’ नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याचा आंदोलनादरम्यान व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पोलिसांनी मुदत संपलेली (2022 मध्ये बनवलेली आणि 2025 मध्ये एक्सपायर झालेली) अश्रूधुराची नळकांडी वापरल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात मनी कंट्रोल या वृत्तसंस्थेने सविस्तर वृत्त दिले आहे.

या व्हिडीओमध्य़े तरूणाने म्हटले की, पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या मुदत संपलेल्या अश्रूधुराची नळकांड्या आहेत. जर हे सरकार अश्रूधुराच्या नळकांड्या मुदत संपलेल्या वापरत असतील तर यांपेक्षा वाईट काहीच नाही. यासोबत त्याने दत संपलेल्या अश्रूधुराची नळकांड्याच्या वापराने काय नुकसान होऊ शकते याचा देखील व्हिडीओ तयार शेअर केला आहे.