
जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी घडलेल्या हिंसाचाराने व्यथित होऊन एक पोस्ट केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करून, झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. “माझा संताप उफाळून आला आहे,” असे म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थ्यांवरील हिंसाचारावर आपला संताप व्यक्त केला आहे.
नीट पेपरफुटीविरोधात सीजेपीचे आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू आहे. 20 जुलै पासुन शेकडो विद्यार्थ्यांनी सीजेपीसोबत संसदेपर्यंत मोर्चा काढला. मात्र, आंदोलनादरम्यान आंदोलक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांच्या लाठीचार्जला सामोरे जावे लागले. दरम्यान, भूमी पेडणेकरपासून ते प्रकाश राज, अनुराग कश्यप आणि हुमा कुरेशीपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
बच्चों से मुझे कहना है कि मैं तुम्हें हज़ार-हज़ार सलाम करता हूँ हिम्मत ना हारें।
और मैं इस मुल्क की हुक़ूमत से बस इतना कहना चाहता हूँ कि सब याद रखा जाएगा – नसीरुद्दीन शाह
pic.twitter.com/EmtfCRaRjr— Saurabh (@sauravyadav1133) July 22, 2026
सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरील आपल्या स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले नसीरुद्दीन शाह यांनीही आंदोलनस्थळी झालेल्या संघर्षाचे फुटेज पाहिल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. X वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, 76 वर्षीय अभिनेते नसीरुद्दीन म्हणाले, “सध्या माझं मन जड झालं आहे आणि ज्या प्रकारे आपल्या मुलांवर क्रूरपणे अत्याचार केले जात आहेत, ते पाहून माझा संताप अनावर झाला आहे. हे अत्याचार मला ICE सारख्या अमेरिकन एजंटची आठवण करून देतात, जे मुखवटा घालून काठ्या घेऊन फिरतात.” तुमच्या स्वतःच्या मुलांचा विचार करा, आणि लक्षात ठेवा की एक दिवस तुम्हालाही तुमच्या कर्माचे फळ भोगावे लागेल. मला या सर्व मुलांना सांगायचे आहे की धीर सोडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत.





























































