
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला ”आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला कोणतेही व्हिडीओ बघण्यात इंटरेस्ट नाही” असे सुनावले आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ च्या संसदेवरील धडक मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अतिबळाचा वापर करत विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. त्याविरोधात दिल्लीतील वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची, न्यायमूर्ती वी मोहना यांच्या खंडपीठाने तातडीने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी सरन्यायधीश सूर्य कांत यांनी ”कृपा करून आमचा आणि स्वत:चा वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ आमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे”, असे म्हटले.
त्यावर वकीलाने काही व्हिडीओ दाखवतो असे सरन्यायधीशांना सांगताच त्यांनी, आम्हाला कोणतेही व्हिडीओ बघण्यात इंटरेस्ट नाही तसेच वेळही नाही, असे याचिकाकर्त्याला सुनावले.





























































