भायखळ्यात रविवारी भव्य रक्तदान शिबीर, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना भायखळा विधानसभेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, २६ जुलै रोजी भायखळा येथे हे शिबीर पार पडणार आहे.

शिवसेना उपनेते व भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक २०९ व २१० यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीनिमित्त माझगाव, लव्हलेन येथील शाखेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभागप्रमुख राम सावंत, सहसंघटक सूर्यकांत पाटील, शाखाप्रमुख सुहास भोसले, निंगाप्पा चलवादी, शाखा संघटक संध्या तळेकर, संगीता कोरे, शाखा समन्वयक रमेश चेंदवनकर, प्रदीप बागवे, तसेच विद्या राबडिया व ऋता कोळी यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.