
स्वराज्याचे जनक लोकमान्य टिळक यांची २३ जुलै रोजी जयंती असून १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे. स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महापौर रितू तावडे तर पुण्यतिथी दिनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे पुष्पहार तसेच पुष्पचक्र अर्पण करून झेंडावंदन करतील. झेंडावंदन सकाळी दहा वाजता होणार आहे.
ज्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी राष्ट्रजागृती केली, परंतु त्यांना दुर्दैवाने स्वातंत्र्य पाहता आले नाही. समस्त देशभक्तांच्या कृतज्ञता भावनेने हे झेंडावंदन होणार आहे. पाहुण्यांचे स्वागत स्थानिक नगरसेविका स्नेहल तेंडुलकर करणार आहेत. लोकमान्य टिळकांचे खापर पणतू रोहित टिळक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी दिली.





























































