थोडक्यात – चर्चगेट रेल्वे स्थानकात शनिवारी आषाढी दिंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेट रेल्वे स्थानकात शनिवारी ‘आषाढी एकादशी दिंडी सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत हा पारंपरिक सोहळा रंगणार आहे. मागील तीस वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपणाऱ्या उपक्रमात यंदाही शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी आणि दिंड्या सहभागी होणार आहेत. या दिंडी सोहळ्यात भाविकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अमोल चौधरी, सचिव आशीष दळवी आणि उपाध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई कार्याध्यक्षपदी पायल खरे
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई महिला कार्याध्यक्षपदी मुंबईच्या नायगाव येथील समाजसेविका पायल राजेंद्र खरे यांची तर नेरळ येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाखरे यांची नवी मुंबई कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार बाबुराव माने यांच्या हस्ते माटुंगा लेबर कॅम्प येथे झालेल्या समाजाच्या मेळाव्यात त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगावकर, कार्याध्यक्ष अशोक देहरे, मुंबईच्या महिला प्रदेशाध्यक्ष शारदा नवले आदी उपस्थित होते.

 

मौखिक आरोग्याविषयी जनजागृती उपक्रम राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी मौखिक आरोग्याविषयी जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. डिंपल पडवे, विभागप्रमुख डॉ. अक्षया बनोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत हा उपक्रम होणार आहे. या वेळी शासकीय दंत महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. मौखिक आरोग्याचे महत्त्व, तंबाखूमुक्त जीवनशैली आणि नियमित दंत तपासणीचा संदिश नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहेत.

 

गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सावंतवाडी संस्थान मराठा समाज वतीने मुंबईत राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएससी आयटी/ कॉम्प्युटर, सीए अॅग्रिकल्चरल, फार्मसी, पदवी, नर्सिंग, इंजिनीअरिंग, मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुकांनी ३० ऑगस्टपर्यंत संस्थेच्या कार्यालयात अर्ज करावे. सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई, स्टार मॉल, तिसरा मजला, दादर, संपर्क: ९१३७४६९३४८. वेळ : दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत.

 

गुहागरमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव ॐ श्री समर्थ शांतीस्थान इच्छापूर्ती सेवा
मंडळाच्या वतीने गुहागर येथील दक्षिण काशी क्षेत्र रेवा नदीकाठी असलेल्या भक्तनिवास येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित केला आहे. श्रीधर घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव होणार आहे. या सोहळ्यानिमित्त दुगदिवी मंदिर ते भक्तनिवास मठापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे