
पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनचे तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मुंबईतील काही भागांत मंगळवारी 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. आधीच मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनमधील 6.6 के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. उद्या, 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 29 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत कामे सुरू राहणार आहेत.
- पावसाळ्यापूर्वी महापालिकेने दैनंदिन पाणीपुरवठय़ात निवासी क्षेत्रासाठी 10 टक्के तर व्यावसायिक क्षेत्रासाठी 20 टक्के पाणीकपात लागू केलेली आहे.


























































