बँकांमध्ये 11 हजार पदांची मेगाभरती! ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात, 21 ऑगस्ट 2026 अखेरची डेडलाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेत नोकरी करू पाहणाऱ्या तरुणांना एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसमार्फत तब्बल 11 हजार 403 लिपिक पदांसाठी मेगाभरती काढण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाली असून अखेरची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा ऑक्टोबर 2026 तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2026 ला घेतली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिपृत वेबसाइट
https://ibpsreg.ibps.in वर देण्यात आली आहे.

लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेला असावा. त्याच्याकडे संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे, म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. एससी, एसटीतील उमेदवारांना 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 850 रुपये तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये फी भरणे आवश्यक आहे.

पूर्व परीक्षा – ऑक्टोबर 2026
निकाल – नोव्हेंबर 2026
मुख्य परीक्षा – डिसेंबर 2026
नोकरीचे पत्र – मार्च 2027
उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर.

या बँकेत नोकरी
बँक ऑफ बडोदा
कॅनरा बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
यूको बँक
बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पंजाब नॅशनल बँक
यूनियन बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
इंडियन बँक
पंजाब अँड सिंध बँक