राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी  विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

उद्या (रविवार) रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 3 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 नागरिकांनी  विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.