‘आरक्षण हटवा’ आंदोलनाला दिल्ली पोलिसांची सशर्त परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-police

दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘आरक्षण हटवा’ आंदोलनास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त 500 लोकांना आंदोलनासाठी पोलिसांनी परवागनी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून या आंदोलनासाठी हरकत नाही अशा प्रकारचा परवाना पोलिसांनी देऊ केला आहे.

आंदोलनासाठी मोर्चा काढणे तसेच तेथे मुक्काम करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. जात आधारित आरक्षणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व देऊन सर्वांना समान संधीची मागणी या आंदोलनातून केली आहे.