पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन अन्यायकारक, रत्नागिरीत शिक्षकांचे धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेने पदवीधर शिक्षकांचे केलेले समुपदेशन चुकीच्या पद्धतीचे असल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आज रत्नागिरी जिल्हापरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

पदवीधर शिक्षक पदासाठी विषयाच्या प्राधान्यक्रमाचे धोरण रद्द करा,पवित्र पोर्टल मधून होणारी शिक्षक भरती त्वरीत थांबवा,वेतनत्रुटी दूर करा अशा विविध मागण्या करत शिक्षकांनी आज रत्नागिरीत धरणे आंदोलन केले.

यावेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष दिलिप महाडिक, सरचिटणीस संतोष पावणे, कोकण विभाग प्रमुख रुपेश जाधव, राज्य पदाधिकारी विलास जाधव, अंकुश गोफणे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष मनिष देसाई, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे जुनी पेन्शन जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण, पुरोगामी जिल्हाध्यक्ष यशवंत पेढाम्बकर उपस्थित होते.