Chandrapur News – राजुरा न्यायालयासमोर गोळीबार; एकाच मृत्यू, आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील न्यायालयासमोर सोमवारी गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्तीने विनोद जाधव यांच्यावर तीन राउंड फायर करून पलायन केले. या गोळीबारात जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

हल्ला कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.