
देशातील सर्वात मोठी खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डने 10 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये 12 तासांत 25,468 हेल्मेट्सचे वितरण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स किताब मिळवला आहे. हा उपक्रम कंपनीच्या प्रमुख रोड सेफ्टी सीएसआर उपक्रम ‘राईड टू सेफ्टी’ चा भाग आहे. या उपक्रमाअंतर्गत सुरक्षित रस्ते अभियानाला प्रोत्साहन देत, दुचाकी वाहनचालक तसेच मागील आसनावरील प्रवाशांमध्ये हेल्मेट वापर वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
कंपनीच्या सिल्व्हर जुबिली वर्षानिमित्त, रस्ते सुरक्षा अभियानाला प्रोत्साहन देणे आणि संरक्षक साधनांचा अधिक वापर वाढवणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात 13 शाळांचा समावेश होता. यात विद्यार्थ्यांना व पालकांना हेल्मेट्स वितरित करण्यात आले. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रोड सेफ्टी रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
























































