
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरात भव्य दहीहंडी महोत्सव होणार असून त्यासाठी उत्सव कार्यकारिणीची घोषणा शिवसेना शाखेत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत करण्यात आली. दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागोठणे शहराचे संपर्कप्रमुख मुकेश भोय यांची तर उपाध्यक्षपदी नागेश सुर्वे, सेक्रेटरीपदी सलीम अत्तार यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेच्या माध्यमातून साजरा करण्यात येणाऱ्या दहीहंडी महोत्सवास १५ वर्षांची परंपरा आहे. रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या दहीहंडी महोत्सवासाठी शिवसेना-युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, विभागप्रमुख प्रकाश मिस्त्री आणि शाखाप्रमुख राजेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीत सहसेक्रेटरीपदी सुहेल पानसरे, खजिनदारपदी संजय पाटील, सहखजिनदारपदी विकास वादळ, कार्याध्यक्षपदी इम्रान पानसरे व कैलास गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. सल्लागार मंडळात कीर्तिकुमार कळस, बाळू रटाटे, श्रीराम मांगले, सलीम शिंदी, चेतन कामथे, संदीप राऊत आणि अविनाश भोसले यांचा समावेश आहे. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून दीपक गायकवाड, मनोज कोळी, प्रवीण चितळे, राकेश चितळकर, शेखर जोगत, रूपेश जगताप, संदीप शिर्के, मोहन फोंडे, प्रसाद कोळी आणि स्वप्नील शिर्के यांची निवड झाली.




























































