दुखापतीचं ग्रहण सुटता सुटेना! हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मार्च महिन्यापासून संघातून बाहेर आहे. दुखापतीने त्याच्या पायात बेड्या घातल्या आहेत. त्यामुळे संघात पुनरागमन करण्यासाठी दुखापतीतून सावरत पंड्या कसून सराव करत आहे. मात्र, त्याच्या मागे लागलेलं दुखापतीच ग्रहण काही सुटता सटत नाहीये. 13 सप्टेंबरपसासून अफगाणिस्तानविरुद्ध तो मैदानात उतरेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, सराव सत्रादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्या पूर्ण तंदुरस्तीच्या मार्गावर होता आणि तशा पद्धतीने त्याचा सरावही सुरू होता. परंतू सरावादरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाल्याने त्याला सध्यातरी गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फलंदाजी करण्यात त्याला कोणतीही अडचण येत नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही ‘सेंटर ऑफ एक्झलन्स’ पूर्ण खात्री पटल्याशिवाय त्याला तंदुरुस्त घोषित करण्यास तयार नाहीये. त्यामुळे 13 ते 17 सप्टेंबरदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान मालिकेसाठी तो वेळेत फिट होण्याची शक्यता कमी आहे.

एका बाजूला हार्दिकच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता वाढली असताना, दुसरीकडे नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर हे खेळाडू दुखापतीतून वेगाने सावरत आहेत. मात्र, जसप्रीत बुमराहची दुखापत अजूनही चिंतेचा विषय बनलेली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी लवकरच निवड समितीची बैठक पार पडणार असून, यामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे.