उड्डाण करताच इंजिन निकामी, इंडिगोच्या गोवा ते दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indigo
फाईल फोटो

गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे उड्डाणानंतर लगेचच इंजिन निकामी झाले. यानंतर विमान पुन्हा माघारी वळवण्यात आले आणि गोवा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवण्यात आले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोच्या 6E 2102 या विमानाने मंगळवारी सकाळी 9.16 वाजता गोव्याच्या मोपा विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण घेतले. मात्र उड्डाणानंतर लगेचच 14,000 फूट उंचीवर असताना विमानाचे इंजिन निकामी झाले. यानंतर विमान माघारी गोवा विमानतळाकडे वळवण्यात आले.

इंजिनमध्ये बिघाडाची माहिती मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सकाळी 9.30 वाजता मोपा विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. यानंतर विमानाने सकाळी 9.50 च्या सुमारास मोपा विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. इंडिगोने या घटनेबाबत एक निवेदन जारी करत घटनेला दुजोरा दिला आहे.