
युक्रेनवर नुकत्याच झालेल्या रशियन हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या १२ जणांमध्ये एका हिंदुस्थानी नागरिकाचाही समावेश आहे, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी दिली.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये झेलेन्स्की म्हणाले की, सोमवारी संध्याकाळपासून ओडेसा शहर आणि लगतच्या परिसरावर गाईडेड एरियल बॉम्ब आणि ड्रोनचे हल्ले सातत्याने सुरू आहेत.
‘या संपूर्ण हल्ल्यात एकूण १२ लोक मारले गेले आहेत, ज्यामध्ये एका हिंदुस्थानी नागरिकाचा समावेश आहे; तसेच डझनभर लोक जखमी झाले आहेत’, असे ते म्हणाले.


























































