विद्यानंदला पोलीस संरक्षण द्या, विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिजे विरोधात आमच्या मुलाने उठवलेला आवाज योग्यच आहे. आमचा मुलगा संविधानिक मार्गाने लढा लढत आहे. त्यामुळे त्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी विद्यानंद बापट यांचे वडील सुहास आणि आई कल्पना बापट यांनी केली आहे. ते सध्या रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावात राहतात. आज पुण्यात विद्यानंद बापटला माराहाण झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

गणेशोत्सवातील डिजे विरोधात आवाज उठवणारा विद्यानंद बापट हा मुळचा गोळप गावचा आहे. त्याचे आई-वडील गोळप गावात राहतात. आज पुण्यात मुलाखत देत असताना विद्यानंद बापट वर भ्याड हल्ला झाला. त्यानंतर त्याचे वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट यांनी मुलाला पाठिंबा देताना सांभाळून काम कर, असा सल्ला देताना माराहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे.