
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान नवीन दैनंदिन एक्स्प्रेस गाडी प्रवासी सेवेत धावणार आहे. सीएसएमटी येथे गुरुवारी दुपारी हिरवा झेंडा दाखवून या एक्स्प्रेस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सीएसएमटी येथून सावंतवाडीपर्यंत गाडी सुरू झाल्याने कोकणवासियांचे थेट गाडीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
फोटो – रुपेश जाधव





























































