आयसीसी क्रमवारी; ईशान किशन अव्वल स्थानी कायम, कसोटीत ऑली रॉबिन्सनची लक्षणीय झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशनने आयसीसीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ईशान पहिल्या, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान दुसऱ्या आणि अभिषेक शर्मा तिसऱ्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्पृष्ट गोलंदाजी केली. या प्रभावी कामगिरीचे फळ म्हणून त्याला आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत लक्षणीय प्रगती साधता आली आहे.

रॉबिन्सन पाचव्या स्थानावर

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत रॉबिन्सनने सहा स्थानांची झेप घेत पाचवे स्थान पटकावले आहे. जुलै 2023 नंतर पहिल्यांदाच तो अव्वल पाचमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्प अजूनही अव्वल कसोटी गोलंदाज आहे. त्याने गेल्या महिन्यात जसप्रीत बुमराहला मागे टाकले होते.

हॅरी ब्रूक अव्वल स्थानी

लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 15 आणि 34 धावा करूनही इंग्लंडचा हॅरी ब्रूक कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज म्हणून कायम आहे. स्टीव्ह स्मिथ आता दुसऱ्या स्थानावर आहे, तर जो रूट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कामिंदू मेंडिसला सर्वाधिक फायदा झाला आहे. मेंडिसने दोन स्थानांची झेप घेत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.