हिंदुस्थानपुढे आता हाँगकाँगचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायलंडवर दमदार विजय मिळवल्यावर हिंदुस्थानचा संघ आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात आता हाँगकाँगशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात विजय मिळवते का, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यात हिंदुस्थानच्या महिलांनी थायलंडला 94 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे कामगिरीत सातत्य ठेवून दुसरा विजय मिळवण्याचे त्यांचे स्वप्न असेल. कारण यानंतर हिंदुस्थानचा तिसरा सामना हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्यामुळे हाँगकाँगविरुद्धच्या विजयामुळे त्यांचे मनोबल उंचावू शकते. फलंदाजीत स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल. रेणुका ठापूर आणि अरुंधती रेड्डी यांची कामगिरीही मोलाची ठरेल.