
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिह्यातील सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी आणि बागलाण, कळवण, चांदवड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघातील प्रभारी शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः जिल्हा सचिव – नीलेश साळुंखे (नाशिक जिल्हा), जिल्हा संघटक – किर्ती जवखेडकर (इगतपुरी, सिन्नर, देवळाली विधानसभा), ऋषी वर्मा (नाशिक लोकसभा), लोकसभा प्रमुख – कारभारी पंडित आहेर (दिंडोरी लोकसभा), महानगर संघटक – विष्णू पवार (नाशिक शहर), संजय परदेशी (नाशिक शहर), उपजिल्हाप्रमुख – सुनील जाधव (कार्यालयीन).
























































