
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलावर केलेल्या दोन मोठय़ा हल्ल्यांत पाकिस्तानी लष्कराचे 25 जवान ठार झाल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केला आहे. बीएलएने पाकिस्तानी लष्कराचे तीन वाहनेही उडवल्याचा दावा केला आहे. बीएलएने सुरुवातीला दावा केला होता की, या हल्ल्यात 18 जवान मारले, परंतु नंतर ही संख्या 25 वर पोहोचली आहे. बीएलएने मीडिया चॅनेल ‘हक्कल’वरून 1 मिनिट 11 सेपंदाचा व्हिडीओ जारी केला.






















































