हुती बंडखोराच्या हल्ल्यात 129 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यमनमध्ये हुथी बंडखोर आणि सरकारी दलांमध्ये झालेल्या भीषण लढाईत 129 जणांचा मृत्यू झाला आहे. हुथी बंडखोर लाल समुद्राचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱया बाब अल-मंदेब सामुद्रधुनीजवळ आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हुथींनी किनारी भागांजवळ जमिनीवरून हल्ला करण्यासोबतच रॉकेट आणि ड्रोनचाही वापर केला. यमन लष्कराच्या माहितीनुसार, त्यांचे 66 जवान मारले गेले आहेत.