
जम्मू-कश्मीरमधील गुमरी आणि जोजिलाच्या उंच डोंगराळ भागात या वर्षीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. यामुळे उंच डोंगराळ भागावर जणू काही बर्फाची चादर पसरली आहे, असे दृश्य दिसत असून थंडीला सुरुवात झाली आहे.
या भागात असलेल्या उंच डोंगरावर बर्फवृष्टी झाल्याने आजूबाजूचा परिसर पांढरा शुभ्र झाला आहे. यामुळे येथील सौंदर्य आणखी खुलले आहे. बर्फवृष्टी झाल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे स्थानिक, पर्यटक आनंदी झाले आहेत. जोजिला परिसर हा कश्मीरहून लडाखला जोडला जाणारा एक महत्त्वाचा डोंगराळ भाग आहे. उंच परिसरात हवामान बदलल्याने तापमान कमी झाले आहे.


























































