
अधिकारी प्रशिक्षण अकादमी चेन्नई एसएससी-122 आणि एसएससी महिला -36 च्या बॅचची पासिंग परेड शनिवारी पार पडली. कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून एकूण 342 ऑफिसर पॅडेट्स हिंदुस्थानी लष्करात दाखल झाले. यात 29 महिला कॅडेट्सचा समावेश आहे. यावेळी मित्र देशांतील 17 कॅडेट्सनेही ओटीए चेन्नईत आपले प्रशिक्षण पूर्ण केले. यात 10 महिला कॅडेट्सचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून चीफ ऑफ द नेवल स्टाफ एडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. यावेळी मोठय़ा संख्येने पालक उपस्थित होते. मुलगा-मुलगी लष्करात अधिकारी झाल्याने आईवडिलांच्या चेहऱयावर आनंद गगनात मावत नव्हता.

























































