
2026-27 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिक, वैद्यकीय तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. परंतु, जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे राज्य सरकारने परिपत्रक जारी करून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.

























































