असं झालं तर… सह-कर्जदाराचा मृत्यू झाल्यास ईएमआय फेडायचाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हप्ता दोघांमध्ये विभागला जाऊ शकतो. लोन अॅग्रीमेंट, मालमत्तेची कागदपत्रे, मृत्युपत्र, वारसा हक्काची कागदपत्रे, विमा पॉलिसी यांवरून भविष्यातील कारवाई ठरते.

जर दोन्ही कर्जदार बँकेप्रती संयुक्त जबाबदारी घेत असतील तर एकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जदारांवर सामान्यतः थकीत कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी पडते.

ईएमआयच्या कायदेशीर वारस किंवा हमीदारावर परतफेड करण्याची जबाबदारी येते. गृहकर्जासोबत लोन प्रोटेक्शन इन्श्युरन्स घेणे चांगला पर्याय असू शकतो.

सह-कर्जदाराच्या मृत्यूची माहिती लवकरात लवकर बँकेला देऊन मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे. कर्जासोबत कोणताही विमा जोडलेला आहे का, हे तपासून दाव्यासाठी अर्ज करावा.

कर्ज खात्यात कोणताही खंड पडू नये म्हणून व पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बँकेच्या नियमांनुसार कागदपत्रे पूर्ण करावीत.