
शिवसेना सचिव व नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्या आई शांता शिवाजी दुर्गे यांचे आज अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 5 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दादर येथील स्मशानभूमीत शांत दुर्गे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

























































