
जम्मू-कश्मीरमधील बडगाम जिह्यात 7 दिवसांपूर्वी ऑपरेशन अशदरदरम्यान मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलाला सापडला. दहशतवाद्याची ओळख यासिर म्हणून झाली आहे. तो लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक होता. यावेळी नाईट व्हिजन क्षमता असलेली एम4 रायफलही जप्त करण्यात आली आहे. एसओजी, डोडा, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दहशतवाद्याचे अवशेष शोधून काढले.
























































