
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या आईवडिलांच्या घरात चोरी झाली आहे. तिचे आईवडील चर्चगेट परिसरात राहतात. घरातून जवळपास पाच लाखांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घरगुती मदतनीस सीमा विनोद घाटेला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने तिला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीमा विनोद घाटे ही मागील दीड वर्षापासून अमीषा पटेलच्या आईवडिलांच्या घरी काम करत होती. अमीषाच्या आईला घरगुती मदतनीसावर संशय होता. त्यांनी तिला चोरीची कबुली देण्यास आणि दागिने परत करण्यास सांगितले होते. परंतु, तिने तसे न केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
























































