
फॉर्च्युन इंडियाने देशातील टॉप-100 अब्जाधीशांची एक नवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 30 उद्योगपतींची एकूण संपत्ती 4.26 लाख कोटींनी घटली असली तरी सावित्री जिंदल यांच्या संपत्तीत मात्र सर्वाधिक 1 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेल्याचे फॉर्च्युनने म्हटले आहे.
फॉर्च्युन इंडियाच्या यादीनुसार मुकेश अंबानी पहिल्या तर गौतम अदानी दुसऱया क्रमांकावर कायम आहेत. मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक 82 हजार कोटी रुपयांनी कमी झाली, तर अदानींची संपत्ती 59 हजार कोटींनी घटली. 56 उद्योगपतींची एकूण संपत्ती 7.70 लाख कोटी रुपयांनी वाढली. यावेळी 13 लोक पहिल्यांदाच टॉप-100 मध्ये समाविष्ट झाले आहेत. श्याम भारती आणि हरी भारती यांच्या संपत्तीत 78 टक्के वाढ झाली. मायनिंग कंपनी रुंगटामाइन्सचे नंदलाल रुंगटा आणि मुकुंद रुंगटा पहिल्यांदाच या यादीत समाविष्ट झाले आहेत.
टॉप 10 सर्वाधिक श्रीमंत
- मुकेश अंबानी
- गौतम अदानी
- सावित्री जिंदाल
- शापूर मिस्त्री आणि कुटुंब
- सुनील मित्तल आणि कुटुंब
- दिलीप संघवी आणि कुटुंब
- रोशनी नाडर मल्होत्रा
- सायरस पूनावाला
- कुमार मंगलम बिर्ला
- अझीम प्रेमजी.























































