दागिने खरे असल्याचे भासवून सराफांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माझ्या भावाचा अपघात झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावयाचे आहे व मला त्यासाठी अर्जंट पैशाची गरज आहे’ असे खोटेनाटे सांगून सोन्याची चेन गहाण ठेवायचा बहाणा करत सराफांना गंडा घालणाऱया एका टोळीला धारावी पोलिसांनी जेरबंद केले.

पैशांची आवश्यकता असल्याच्या बहाण्याने बनावट दागिने खरे असल्याचे भासवून धारावी येथील एका सराफाची महिलेने फसवणूक केली होती. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि सपोनि प्रमोद साळोखे तसेच गाडेकर, अनपट, कोळी, भोसले, मंडले या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा राजकुमार जैन हे त्यांच्या दुकानात असताना तन्वी महाडलेकर या महिलेने दुकानांमध्ये येऊन सोन्याची चेन गहाण ठेवायची आहे असे सांगत सोन्याऐवजी पिवळ्या धातूची चेन देऊन 90 हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. मग त्यानुसार तन्वी हिच्याबरोबर सलोनी महामुणकर, स्नेहा गायकवाड, हिरेन सोळंकी आणि तुषार देवजी महिढा ऊर्फ मॅक्स अशा पाच जणांना अटक केली. आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.