
गुजरातच्या ग्रामीण भागातील 90 टक्के पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल कॅगने दिला आहे. यामुळे भाजप सरकारची जुमलेबाजी उघड झाली असून गुजरात मॉडेलचीही पोलखोल झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ‘डेक्कन हेराल्ड‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
गुजरात विधानसभेत सादर करण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालातून ग्रामीण भागातील 89 क्के पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे समोर आले आहे. 2019-20 ते 2023-24 या कालावधीत राबवण्यात आलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत या पाहणीचा अहवाल समोर आला आहे. यासाठी 48 गावातील 960 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
अमरेली, आनंद, भडोच, दाहोद, गुजरातची राजधानी गांधीनगर आणि पाटण या जिल्ह्यांतील 7 गावांच्या पाण्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी केली असता 65 टक्के नमुन्यांमध्ये टोटल हार्डनेस प्रमाणापेक्षा जास्त, तर 63 टक्के नमुन्यांमध्ये गढूळपणा आढळून आला. 56 टक्के नमुन्यांमध्ये टीडीएस आणि एकूण क्षारतेचे प्रमाण जास्त आढळून आले, तर 50 टक्के नमुन्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले.
अहवालात केवळ पाण्याच्या गुणवत्तेवरच नाही, तर ग्रामस्तरावर काम करणाऱ्या पाणी समित्यांच्या रचनेवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. नियमानुसार पाणी समित्यांमध्ये किमान 6 महिला आणि एकूण 50 टक्के महिला सदस्य असणे बंधनकारक आहे. मात्र, 9 समित्यांमध्ये महिलांचे प्रमाण कमी होते, तर 5 पाणी समित्यांमध्ये एकही महिला सदस्य नव्हती. नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती समुदायाचे किमान 25 टक्के सदस्य असणे आवश्यक आहे. मात्र, 12 समित्यांमध्ये हे प्रमाण पाळले गेले नाही आणि 7 समित्यांमध्ये एकही SC/ST सदस्य नव्हता. तसेच पाणी समितीची निवड संपूर्ण गावाच्या उपस्थितीत ग्रामसभेत होणे गरजेचे असताना, ती केवळ निवडक सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीत केली गेल्याची त्रुटीही समोर आली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला समाचार
कॅगचा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. गुजरातमध्ये गेल्या अनेक दशकांपासून भाजपची सत्ता असूनही राज्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केंद्राच्या हर घर जल आणि जल जीवन मिशन अंतर्गत ऑक्टोबर 2022 मध्येच राज्यात 100 टक्के नळ कनेक्शन दिल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कॅगच्या ताज्या अहवालाने या दाव्यांमधील फोलपणा उघड केला आहे, अशी टीका खरगे यांनी केली.
मोदी जी के “हर घर जल” के दावे दूषित पानी में बह गए !
गुजरात में दशकों से भाजपा राज है पर 9 में से 10 water samples में पानी पीने लायक़ नहीं है।
जब मोदी जी CM थे, 2004 में “सुजलाम-सुफलाम” योजना का ढिंढोरा पीटा गया। आज भी गुजरात की जनता बूंद-बूंद पानी के लिए तरस रही है।
PM… pic.twitter.com/G2z6rUzRlo
— Mallikarjun Kharge (@kharge) September 12, 2026























































